ईन्टेंसिफाइड आयईसी कॅम्पेन अंतर्गत महाराष्ट्रातील गावपातळीवरील सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील मंडळी यांची एचआयव्ही /एड्स जनजागृती करिता संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली.
महाराष्ट्रातील शालेय शिक्षक व शिक्षिका यांचे किशोरवयीन जीवन कौशल्य कार्यक्रमांतर्गत किशोरवस्था, मानसिक आरोग्य इतर समस्या, या विषयांवर कार्यशाळा घेण्यात आली.
आंतरराष्ट्रीय युवा दिना निमित्त महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयातील रेड रिबन क्लब च्या विधार्थ्यांकरिता एचआयव्ही /एड्स विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागा मार्फत रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांची संवेदनशील कार्यशाळा घेण्यात आली .
आंतरराष्ट्रीय युवा दिन राज्यस्तरीय कार्यक्रम २०२५
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, बीड यांच्या वतीने तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे रेड रिबन क्लबच्या नोडल अधिकारी व पिअर एज्युकेटर्स यांच्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष यवतमाळ यांच्या माध्यमातून RRC नोडलं ऑफिसर आणि पिअर एजुकेटर यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले.
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग जिल्हा रुग्णालय धुळे यांच्या मार्फत किशोरवयीन जीवन कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत शालेय शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
भंडारा जिल्ह्यात किशोरवयीन शिक्षण कार्यक्रमांतर्गत शालेय शिक्षकांचे प्रशिक्षण पार पडले.
आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती करिता लातूर जिल्ह्यात रेड रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
उल्हासनगर येथील सेवा सदन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लबच्या विद्यार्थ्यांनी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित एचआयव्ही/ एड्स जागरूकता कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.