Skip to main content

Maharashtra State Aids Control Society
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था

call हेल्पलाइन १०९७
vision-values-banner

STI/RTI सेवा

STI / RTI सेवा

 

असुरक्षित लैंगिक वर्तनामुळे गुप्तरोग आणि एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका वाढतो. गुप्तरोगाचे निदान सहजरित्या होऊ शकते आणि सिंड्रोमिक उपचार पध्दतीद्वारे प्रभावी पणे उपचार करता येऊ शकतो.  

लैंगिक संक्रमित संसर्ग आणि पुनरुत्पादक मार्गाचे संक्रमण या राज्यातील महत्त्वाच्या सार्वजनिक आरोग्य समस्या आहेत. एसटीआय/आरटीआयचे प्रतिबंध आणि व्यवस्थापन हे राज्यातील एचआयव्ही/एड्सचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी महत्वाचे धोरण आहे . 

 एसटीआय/आरटीआय असलेल्या व्यक्तींना एचआयव्ही ची लागण होण्याची शक्यता अधिक  असते. लैंगिक संक्रमित संसर्गांवर उपचार करण्यासाठी, 53 DSRCs (नियुक्त STI/RTI क्लिनिक) स्थापन करण्यात आले आहेत त्यापैकी 51 महाराष्ट्र SACS अंतर्गत 34 जिल्ह्यांमध्ये (मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता) कार्यरत आहेत.
 या DSRCs द्वारे, लैंगिक संक्रमित संसर्गाचे निदान केले जाते, उपचार केले जातात आणि रुग्णांचे समुपदेशन केले जाते आणि औषधे मोफत दिली जातात. त्यामुळे एचआयव्ही/एड्सचा प्रसार कमी होत आहे. 

Back to top Back to top