जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, बीड यांच्या वतीने तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे रेड रिबन क्लबच्या नोडल अधिकारी व पिअर एज्युकेटर्स यांच्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष यवतमाळ यांच्या माध्यमातून RRC नोडलं ऑफिसर आणि पिअर एजुकेटर यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले.
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग जिल्हा रुग्णालय धुळे यांच्या मार्फत किशोरवयीन जीवन कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत शालेय शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
भंडारा जिल्ह्यात किशोरवयीन शिक्षण कार्यक्रमांतर्गत शालेय शिक्षकांचे प्रशिक्षण पार पडले.
आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती करिता लातूर जिल्ह्यात रेड रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
उल्हासनगर येथील सेवा सदन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लबच्या विद्यार्थ्यांनी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित एचआयव्ही/ एड्स जागरूकता कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती करिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यवतमाळ यांच्या मार्फ़त प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली .
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ . विजय कंदेवाड यांनी आषाढी वारी निमित्त लावण्यात आलेल्या आयसीटीसी स्टॉल ला भेट दिली .
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे मार्फत किशोरवयीन व युवा सपोर्ट ग्रुप व्यवस्थापन या विषयांवर एआरटी समुपदेशकांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे चे प्रकल्प संचालक डॉ. सुनिल भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय क्लस्टर प्रोग्राम ऑफिसर यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
नाशिक शहर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची एचआयव्ही/एड्स विषयक संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेस 92 अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.