ए आर टी एच आय व्ही ची वाढ रोखते व त्यामुळे त्यांची संख्या घटवते. यामुळे शरीराच्या सुरक्षा प्रणालीचे होणारे नुकसान रीखले जाते व एक चांगल्या प्रतीचे व दीर्घायुष्य जगता येते. जीवनासाठी ही ए आर व्ही औषधे घेणे आवश्यक आहे. ही खूप शक्तीशाली असून त्यांचे काही दुष्परिणामही आहेत. त्यामुळे ही ए आर टी औषधे नियमित व वैद्यकीय मार्गादार्षानाखालीक घेतली गेली पाहिजेत. जागतिक आरोग्य संघटनेने काही मापदंड घालून दिले आहेत जे ए आर टी सुरू करण्यासाठी वापरले जातात. परंतू ए आर टी सुरू करण्यासाठीचा निर्नाय मात्र वैद्यकीय तद्न्यांवर सोडला पाहिजे. लक्षणे, औषधांचा दुष्परिणाम व अवलंब यांचा विचार करून वैद्यकीय तज्ञ ए आर टी सुरू करण्या विषयी ठरवतील. सामान्यपणे जर सी डी-४ काउंट जर २०० पेक्षा कमी असेल तर ए आर टी ची शिफारस केली जाते. जर सी डी-४ काउंट २०० ते ३५० च्या दरम्यान असेल, तर ते वैद्यकीय स्थितीवर अवलंबून असेल आणि जर ३५० पेक्षा जास्त असेल तर सामान्यपणे ए आर टी सुरू केली जात नाहीत. परंतू सहा महिन्यांच्या अंतराने नियमित फॉलो अपची शिफारस केली जाते.
माहिती शिक्षण व संपर्क
नाटक मंडळी, लोक कलाकार, माहितीपत्रके, भित्ती पत्रके, फलक, दूरदर्शन वरील कार्यक्रम, रेडिओ वरील जिंगल्स, प्रदर्शनी वर्तमान पत्रातील जाहिराती यांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करणे, मानसिकता बदलाने व वागणुकीत परिवर्तन घडवणे यासाठी आय ई सी चा उपयोग केला जातो.
जोपर्यंत त्याला औषध नाही तोवर प्रतिबंध हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी आय ई सी च्या माध्यमातून जनजागृती करणे व त्यायोगे वागणुकीत परिवर्तन घडवून सुरक्षित लैंगिक संबंध व kalank व भेदभाव दूर करणे यावर आय ई सी द्वारे भर दिला जातो.
रणनीती
राज्यभर सर्वत्र सारखी आय ई सी रणनीती.
व्यावसायिक दृष्टीकोन
संपर्क व मार्केटिंग क्षेत्रातील व्यावसायिक लोकांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षण
कठोर निगराणी.
लक्षित हस्तक्षेप
लक्षित हस्तक्षेप
लोकसंख्येतील सर्वात दुबळ्या व रेषेवरील लोकांमध्ये प्रसारणाचा दर कमी करणे हा लक्षित हस्तक्षेपाच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. रोग अधिक पसरू नये यासाठी केलेल्या उपायांमधील एक उपाय म्हणजे थेट हस्तक्षेप करून बहु आयामी रणनीतीचा वापर करून लोकांपर्यंत हा विषय नेणे, वागणुकीतल्या परीवार्तानापासून सुरुवात करून, समुपदेशन, आरोग्य विषयक मदत करणे, एस टी डी मधून संक्रमित होणार्या आजारांवर उपचार, व वागणुकीत बदल होईल अशी वातावरण निर्मिती करणे. लक्षित हस्तक्षेप हा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम - भाग २ मधील एक महत्त्वाचा घटक आहे.
चार प्रमुख तत्त्व / घटक
- वागण्यातील बदलाची माहिती पिअर एज्युकेतर सहित : ज्या लोकांना माहिती सांगायची आहे त्यांच्या जवळचे मित्र किंवा प्रशिक्षक यांच्या मार्फत योग्य माहिती पुरवणे.
- कंडोम प्रोग्रामिंग : एस टी आय ची लागणं रोखण्यासाठी संपर्क माध्यम आणि स्वीकारार्हता स्किल्स आणि सातत्य वाढवण्यासाठी कंडोमचा वापर वाढवणे.
- एस टी आय ची काळजी आणि समुपदेशन : पुरवठादारांना तांत्रिक व मानसिक बाबींमधील माहिती देणे . व क्वालीतीची काळजी घेणे ( पार्टनर नोटिफिकेशन, औषधे, समुपदेशन आणि कंडोमची व्यवस्था)
- एक योग्य वातावरण निर्मिती करणे : एका अश्या वातावरणाची निर्मिती करणे ज्यातून धोक्याची भावना निर्माण होईल व कायदे विषयक आणि पोलिसीतील बदल ज्यामुळे वर्तणुकीत बदल होईल.
एड्स आणि एच आय व्ही हे भारतातील सार्वजनिक आरोग्य विभागा पुढील एक गंभीर आव्हान आहे ज्याचे मानसिक आणि आर्थिक परिणाम आहेत. स्वयंसेवी संस्थांचा या लोकांशी जवळचा व प्रत्यक्ष संबंध असल्याने ते या लक्क्षित हस्तक्षेप व समुपदेशन कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा घटक ठरू शकतात.