महाराष्ट्र राज्य एड्स
नियंत्रण संस्था
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था ( मुंबई व मुंबई उपनगर वगळून ) सन १९९९ पासून एचआयव्ही/एड्स प्रतिबंधासाठी राज्याच्या ३४ जिल्ह्यात कार्यन्वित आहेत. एड्सवर पूर्णत्वाने मात करणेकरीता कोणतेही औषध अथवा लस आद्यपि उपलब्ध नसल्यामुळे या रोगाला प्रतिबंध करणे हाच एकमेव उपाय सध्या उपलब्ध आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी भारतात केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सन १९९२ पासून राबविण्यात येत आहे. राज्यात एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची स्थापना माहे जुलै १९९८ मध्ये करण्यात आली आहे. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात योग्य माहितीच्या प्रचार प्रसाराच्या तसेच जनजागृतीपर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली.
श्री. मिलिंद म्हैसकर (भा.प्र.से)
अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग तथा प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था