facebook

धोरणे व मार्गदर्शक तत्त्व

हाय रिस्क ग्रुप पासून सामान्य लोकांपर्यंत पसरलेला आणि सुरुवातीच्या हॉट स्पॉट पासून नवीन भागात वाढलेला एड्स आणि एच आय व्ही चा राक्षस देशाला  या  संकटां पासून सोडवण्यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण  धोरणाची गरज अधोरेखित  करतो.


भारतातील एड्स आणि एच आय व्ही च्या संदर्भातील ध्येय धोरणे व मार्गदर्शक तत्त्वांवरून तो एक सार्वजनिक आरोग्याचा विषय न वाटता विकासातील अडथळा वाटतो. त्यामुळे एन ए सी पी -३ मध्ये अनेक विकास कार्यक्रम जसे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन ( एन आर एच एम), रीप्रोदक्तीव्ह एंड चाईल्ड हेल्थ प्रोग्राम ( आर सी एच ) व राष्ट्रीय सुधारित टी बी नियंत्रण कार्यक्रम ( आर एन टी सी पी) समाविष्ट करण्यात आले आहेत. एच आय व्ही चे संक्रमण रोखणे हा या सर्व कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

प्रतिबंधक सेवांमध्ये जागरूकता निर्माण करणे, कंडोमचा वापर वाढवणे, मते पासून बालकाला होणारे संक्रमण रोखणे, आय सी टी सी सेवा वाढवणे, ऐच्छिक  रक्तदानाला उत्तेजन देउन सुरक्षित रक्त पुरवठा वाढवणे यांचा समावेश होतो. या ध्येय धोरणांमध्ये इंजेक्तिंग ड्रग युजर्स , पुरुषांचा समलिंगी संबंध , वेश्या या सारख्या काही हाय रिस्क ग्रुपमध्ये लक्षित हस्त्क्षेपाचीही काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

याशिवाय, काही सामान्य कारणांमुळे होणारा संसर्ग रोखणे इत्यादीही काही मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे.