facebook

रक्त सुरक्षा कार्यक्रम

नेशनल ब्लड पोलिसी , उत्कृष्ट  ब्लड ट्रान्सफ्युजन सेवा हा हेल्थ केअर डिलिव्हरी सिसटीमचा एक महत्त्वाचा भाग आहे.
कार्यक्रमाची उद्दिष्टे : ( नेशनल ब्लड पॉलिसी)  ( Objectives of the program)
चांगल्या प्रतीच्या रक्त व रक्त घटकांचा सहज उपलब्ध होणारा योग्य प्रमाणातील पुरवठा करणे .
१. ते त्रांस्फ्युजन मधून येणार्या लागनीनापासून मुक्त असावे.
२. ते कोणतेही पैसे न देता दात्यांकडून गोळा केलेले असावे.
३.  यंत्रसामग्रीने सुसज्ज अश्या ठिकाणी ते गोळा केलेले , ठेवलेले तसेच साठवलेले असावे.
४. योग्य स्थितीत त्याचे परिवहन केलेले असावे.
५. प्रशिक्षित कर्मचार्यांकडून त्याची देखभाल करण्यात यावी.

  • रक्ताचा योग्य वैद्यकीय वापर वाढवणे.
  • आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे .
  • रक्तदात्यांच्या माहिती, प्रशिक्षण आणि प्रेरणेसाठी विविध कार्यक्रम आयोजित करणे.
  • नियंत्रणासाठी आवश्यक त्या नियामक व कायदेशीर बाबींचा आधार घेणे.
  • राक्तपेध्यांमधील नफेखोरीला आळा घालणे.

एच आय व्ही / टी बी ची लागण
एच आय व्ही चा भस्मासुर झपाट्याने सर्वदूर पसरत असल्याने त्या संदर्भात एच आय व्ही रुग्णांच्या मदतीसाठी काही रणनीती ठरवून त्याप्रमाणे त्यांना सेवा देणे खूप गरजेचे झाले आहे. एच आय व्ही मुळे
टी बी चा भार वाढला आहे.  विशेषत: अश्या देशांमध्ये जिथे एच आय व्ही आणि टी बी ची लागण होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. तरीही एच आय व्ही- टी बी ची लागणं झालेल्या रुग्णांची नेमकी संख्या माहीत नाही.
टी बी इन्फेक्शन मधून एखादा रोग होण्यामध्ये एच आय व्ही ची लागणं होण्याचे धोके खूप जास्त असतात. फक्त टी बी ची लागणं झालेल्या लोकांमध्ये जीवनकालाचा धोका हा एच आय व्ही व टी बी अशी दोन्हीची लागण झालेल्या रुग्णांमध्ये हा धोका ५० % जास्त असतो. एच आय व्ही ची लागणं झालेल्या माणसापेक्षा टी बी चे संक्रमण होण्याचा दर हा ३० पट अधिक असतो.

६-७ पट व्हायरल लोड वाढल्याने टी बी एच आय व्ही च्या वाढीला चालनाच देतो. एच आय व्ही ची लागणं झालेल्या माणसाच्या जगण्याचा कालावधी तो कमी करतो आणि एड्सच्या ३ पैकी एका व्यक्तीच्या मृत्यूचे कारण असतो.
आपल्यासारख्या विकसनशील देशात एच आय व्ही एड्स आणि टी बी च्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपलब्ध असलेल्या सेवा आणि बजेट पुरते ढासळले. त्यामुळे एड्स आणि टी बी वरील कार्यक्रम एकत्रितपणे राबवून एच आय व्ही व टी बी च्या महासंकटा एकत्र लढा देण्याची हीच वेळ आहे.
भारतात,  दाखल झालेल्या ६० % पेक्षा अधिक केसेस मध्ये रुग्णांना टी बी ची लागण झालेली असते. तरीही, एका एच आय व्ही बाधित व्यक्तीला योग्य उपचार व लसीकरण न झाल्यामुळे त्याचे आयुष्य अंध:कारमय होते. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की प्रत्यक्ष पाहणीतल्या उपचारांनी (डॉटस) टी बी बरा होऊ शकतो. डॉटस च्या उपचारांनी एखाद्या व्यक्तीला दीर्घ आणि चांगले आयुष्य मिळू  शकते.
एच आय व्ही व टी बी मुळे येणारे हे गंभीर संकट ओळखून महाराष्ट्र राज्याने एड्स व
टी बी नियंत्रणासाठी एकत्रितपणे पाउल उचलले आहे.

एच आय व्ही - टी बी ची राज्यस्तरीय समन्वय समिती
नवी दिल्ली येथे ८ जून २००१ रोजी झालेल्या एच आय व्ही- टी बी वरील राष्ट्रीय बैठकी नंतर एच आय व्ही - टी बी ची राज्यस्तरीय  समन्वय समिती स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. ही समिती सामाजिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. या समितीत आरोग्य सेवांचे महासंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक, एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प अधिकारी, राज्य क्षयरोग अधिकारी, कार्यकारी  आरोग्य अधिकारी ( मुंबई), ई एस आय एस चे प्रतिनिधी एड्स नियंत्रण संस्था व मुंबई जिल्हा टी बी नियंत्रण संस्थेचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प अधिकारी यांचे बरोबर डब्ल्यू एच ओ सल्लागार सदस्य सचिव म्हणून आहेत.