facebook

ध्येय आणि उद्दिष्टे

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील तिसऱ्या टप्प्याचा (NACP III) मुख्य उद्देश - येत्या पाच वर्षात देशभरातील एचआयव्ही-एड्सची साथ थांबवून त्यावर नियंत्रण ठेवणे हा आहे. सर्वसमावेशक प्रतिबंधात्मक उपाय, रुग्णांची काळजी, त्यांना आधार देणे आणि उपचार करणे याद्बारे हे उद्दीष्ट साध्य करण्यात येईल. त्यासाठी चार प्रदीर्घ कार्यपद्धती अनुसरण्यात येतील.

-          लागण होण्याचा सर्वाधिक धोका असणाऱ्या गटाबरोबर थेट मध्यस्थी करून संवाद साधणे आणि सर्वसाधारण लोकांबरोबरचा संवाद वाढवणे

-          एचआयव्ही –एड्ससोबत जगणाऱ्या व्यक्तींना अधिकाधिक उपचार, आधार पुरवणे व त्यांची काळजी घेणे

-          जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रतिबंध- काळजी-आधार –उपचार सेवा देणारी यंत्रणा अधिक बळकट करणे. सुविधा आणि मनुष्यबळ वाढवणे

-          देशभरातील माहिती व्यवस्थापन यंत्रणा बळकट करणे

महत्त्वाचे उद्दीष्ट म्हणजे – ज्या राज्यांमध्ये एड्सचा सर्वाधिक प्रादूर्भाव आहे, अशा राज्यांमध्ये कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षात लागणीचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा कमी करून साथ आटोक्यात आणणे. तसेच जी राज्य धोकादायक पातळी गाठू शकतात अशा राज्यांमध्ये हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत कमी करून साथ नियंत्रणात ठेवणे.