facebook

मार्गदर्शक तत्त्व

म.रा.ए.नि.सं चे लक्ष्य, उद्देश आणि कार्यपद्धती खालील मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरली आहे

  • तीन एकात्म गोष्टींचा मिलाप – एकात्मिक मान्यताप्राप्त कार्य आराखडा, एकात्मिक राष्ट्रीय एचआयव्ही/एड्स समन्वय प्राधिकरण आणि एकात्मिक राष्ट्रीय अधिकार आणि मूल्यांकन प्रणाली
  • एड्स प्रतिबंध आणि त्याचा दुष्परिणाम कमी करणे अशा दोनही बाबतीत समानतेची भावना जोपासावी. म्हणजेच सेवांचा उपयोग करून घेणाऱ्या लोकांचे वय आणि लिंग यानुसार वर्गीकरण करून तशी समानता साधली पाहिजे.
  • एचआयव्ही- एड्स सोबत जगणाऱ्या लोकांना आदराने वागवावे, कारण एचआयव्ही प्रसारावर अंकुश आणि एड्सनियंत्रण या कामात त्यामुळे चांगाला फायदा होतो. NACP च्या तिसऱ्या टप्प्यात एचआयव्ही एड्स संबंधी मानवी हक्कांची जपणूक कशी करावी याचा ऊहापोह झाला आहे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एचआयव्ही-एड्ससोबत जगणाऱ्या व्यक्तींच्या मूलभूत अधिकारांचा आहे. एचआयव्हीला प्रतिबंध, उपचार, आधार आणि काळजीसंदर्भातील कामांमध्ये या व्यक्तींना सामावून घेणे महत्त्वाचे आहे.
  • एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये समाजाचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. त्यांच्या सहभागाशिवाय या कार्यक्रमाला सामाजिक अधिष्ठान मिळणार नाही.
  • एचआयव्हीची लागण झालेल्या आणि त्याचा परिणाम झालेल्या लोकांना प्रतिष्ठेचे जीवन जगता येईल, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे. सर्व कार्यक्रमांचा रोख हाच असला पाहिजे.
  • एचआयव्ही प्रतिबंध, उपचार आणि आधार यासंबंधी सेवा सर्वसमावेशक असाव्यात. समाजातील प्रत्येकाला त्या सेवांपर्यंत पोचता यायला हवे.
  • योग्यता, स्पर्धा, बांधिलकी आणि पाठपुरावा या तत्त्वांनुसार एड्स नियंत्रण संस्थेच्या मनुष्यबळ विभागाच्या कामाची आखणी केलेली असावी. अशा तत्त्वांमुळेच नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.

कार्यक्रम पद्धती आणि कामाची आखणी प्रत्यक्षदर्शी असावी. ज्यातून उद्दीष्टपूर्ती होऊ शकेल अशी नाविन्यपूर्ण आणि लवचिक असावी. ठराविक स्थानिक परिस्थितीनुसार प्राधान्यक्रम गृहित आहे.