facebook

आमच्या विषयी

महत्त्वाचे टप्पे

१९८६ – एड्सचा  पहिला रुग्ण १९८६ मध्ये सापडला

१९८६ – राष्ट्रीय एड्स समिती ही उच्चस्तरीय समिती स्थापन

१९९२ – नॅको (NACO) ची स्थापना

१९९२ – आरोग्य सेवा संचालनालयाअंतर्गत (DHS) एड्स विभाग स्थापन

१९९२ – राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या (NACP) पहिल्या टप्प्याला सुरवात

१९९८ – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची (MSACS) स्थापना

१९९८- NACP च्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात

२००४ – एड्स-क्षय- मलेरिया शी सामना करणाऱ्या जागतिक गटाची (GFATM) दुसरी फेरी सुरू

२००५ – GFATM ची तिसरी आणि चौथी फेरी सुरू

 

महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ३.०८ लाख चौ किमी क्षेत्रफळ असलेल्या महाराष्ट्राची लोकसंख्या १० कोटी आहे. ग्रामीण आणि शहरी भागात पसरलेल्या आरोग्यसेवेच्या जाळ्यामुळे आरोग्याच्या बाबतीत हे राज्य जगात नेहमीच आघाडीवर राहिले आहे. महाराष्ट्रातील आरोग्य आस्थापना भारत सरकारच्या आधुनिक आरोग्य योजनेअंर्गत येणाऱ्या आवश्यक बाबींची पूर्तता करतात. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात निर्माण केलेल्या आरोग्यविषयक सुविधांमुळे प्रतिबंध, उपचार, पुनर्वसन अशा सर्व सेवा पुरवल्या जात आहेत. राज्यात पहिला एड्सचा रुग्ण मुंबईत १९८६ साली सापडला. प्रभावी एचआयव्ही निवारण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील या आजाराची साथसदृष परिस्थिती आवाक्यात आली.

म.रा.ए.नि.सं ची उद्दीष्ट्ये

अ)    एचआयव्ही आणि एड्सचा प्रतिबंध

ब) एचआयव्ही आणि एड्मुळेबाधित कर्मचाऱ्यांना भोगाव्या लागणाऱ्या सामाजिक दु्ष्परिणामांचा भार हलका करणे आणि असे कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांचे  व्यवस्थापन

क) एचआयव्ही आणि एड्सबाधित कर्मचाऱ्यांना आधार देणे आणि त्यांची देखभाल करणे

ड) कामाच्या किंवा नोकरीच्या ठिकाणी एचआयव्हीमुळे होणारी सामाजिक कुचंबणा थांबवणे आणि या कारणासाठी होणाऱ्या भेदभावाला कलंकाला अवरोध करणे

 

संपर्क

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था

अँकवर्थ लेप्रसी कंपाउंड हॉस्पिटल, आर. ए. किडवाई मार्ग,

वडाळा (पश्चिम), मुंबई ४०००३१

दूरध्वनी – २४११३०९