facebook

मूल्य आणि दृष्टीकोन

भारतातील प्रत्येक एचआयव्हीबाधित व्यक्तीला दर्जात्मक उपचार मिळतील आणि तेही प्रतिष्ठेने मिळतील, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे, अशीMSACS  ची दृष्टी आहे. एचआयव्ही/एड्स बाधितांवर उपचार, प्रतिबंध आणि त्यांना आधार देण्याचे काम मानवी हक्कांचे संरक्षण होईल अशा वातावरणात शक्य आहे. एचआयव्हीबाधित व्यक्ती कुचंबणेशिवाय, कलंकाशिवाय सन्मानाने जगू शकली पाहिजे.

 

एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना समानतेने सर्व आरोग्यसुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत यासाठी MSACS  च्या वतीने उपाययोजना करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, विश्वासू संस्था, एचआयव्हीबाधित लोकांचे नेटवर्क आणि गट यांच्या सहकार्याने  आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणे तसेच जबाबदार सेवा वाढवण्याची MSACS आशा करीत आहे. एचआयव्हीबाधित व्यक्तींनी या आजाराला समर्थपणे सामोरे जावे यासाठी राज्यपातळीवर, जिल्हा पातळीवर आणि तळागाळातदेखील आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

 

MSACS च्या माध्यमातून अशाप्रकारे सर्व स्तरातील लोकांपर्यंत योग्य संदेश पोचवत भारतात एचआयव्हीच्या प्रसाराला लगाम घालण्यासाठी आम्ही बांधील आहोत. लोकांपर्यंत एचआयव्हीबाबतची संपूर्ण, अचूक आणि सतत माहिती पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर सुरक्षेसाठी कंडोमचा वापर करण्याबाबतचा प्रसार आणि लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारांवरील उपचार यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो. स्त्री- पुरुषांची लैंगिक संबंधांबाबतची वागणूक जबाबदार असावी, यासाठी MSACS काम करीत आहे.

 

माहिती आणि ज्ञानातून लोकांना जागरुक, सतर्क, सिद्ध आणि सबल केल्यास ते एचआयव्हीपासून स्वतःचा बचाव करू शकतील, यावर आमचा विश्वास आहे. एचआयव्हीची लागण आपल्यापैकी कुणालाही होऊ शकते या सत्याशी आम्ही मुकाबला करतो. योग्य माहिती आणि प्रतिबंध यामधून आपण कुणाचाही बचाव करू शकतो, अशी आमची आशा आहे. काळजी घेणे आणि आधार देणे या पायांवर MSACS उभे आहे. भारतातील एचआयव्ही/एड्सविरोधात लढाईसाठी सतत पाठपुरावा करत राहण्याचा आमचा निर्धार आहे

 

म.रा.ए.नि.सं चा दृष्टीकोन

 • सर्वसमावेशक संवादातून विविध लोकांपर्यंत पोचणे
 • अनुभवाधारित आराखडा असलेला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम राबवणे
 • विकास उद्दीष्ट गाठणे
 • एचआयव्ही/एड्सचा प्रसार आणि प्रादुर्भाव याबाबत नियमित पारदर्शी अंदाज देणे
 • एचआयव्ही/एड्स पासून सुरक्षित असा भारत उभारणे
 • सहकार्यातून विकास साधणे
 • देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत एचआयव्ही बाबत माहिती पोचविणे आणि त्यासोबतचा कलंक – भेदभाव पुसून टाकणे
 • असा भारत जिथे प्रत्येक एचआयव्ही बाधित गरोदरस्त्री एचआयव्हीमुक्त बालकाला जन्म देऊ शकेल
 • असा भारत जिथे प्रत्येक व्यक्तीला समुपदेशन आणि तपासणी केंद्र उपलब्ध असेल
 • असा भारत जिथे एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीला प्रतिष्ठेसह आणि दर्जात्मक उपचार मिळतील
 • असा भारत जिथे प्रत्येक व्यक्ती प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निरोगी आणि सुरक्षित आयुष्य जगेल
 • असा भारत जिथे एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचता येईल आणि त्याची माहिती उपलब्ध असेल