facebook

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था

महाराष्ट्र हे १०० दशलक्ष लोकसंख्येचे आणि ३.०८ स्क्वे. कि. मी. चा विस्तार असलेले भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. आपल्या ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्र आरोग्य सुविधा देण्याच्या बाबतीत संपूर्ण जगात आघाडीवर राहिले आहे.

 

ह्या साऱ्यां सुविधांकडून भारत सरकारने आरोग्य योजनांच्या संदर्भात दिलेले मापदंड पूर्ण केले जातात. ग्रामीण व शहरी भागातील सेवांच्या ह्या विस्तृत जाळ्यामुळे एक प्रोत्साहक, उपकारात्मक आणि पुनर्वसाना संबंधीचे एक   मोठे पेकेज दिले गेले आहे.

 

१९८६ मध्ये मुंबईतून  एड्सची  पहिली केस दाखल झाली.

राज्यभरात एच आय व्ही सेवांच्या एका परिणामकारक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुले राज्यातल्या एपिडेमिओल्जिकल स्थितीची कल्पना आली.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची उद्दिष्टे :

(अ) एच आय व्ही व एड्सचे उच्चाटन

(ब) कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर एच आय व्ही व एड्सच्या होणार्या परिणामांचे व्यवस्थापन व निर्मूलन.

(क) एच आय व्ही व एड्सच्या बाधित कर्मचार्यांची काळजी व त्याना आधार.

(ड) कार्याच्या ठिकाणी व रोजगाराच्या वेळी खर्या व समजल्या गेलेल्या एच आय व्ही च्या स्थितीवर आधारित कलांकांचे   उन्मूलन.